नगर (प्रतिनिधी) – राज्य शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बापू(संतोष) तांबे यांची निवड करण्यात आली आहे.राज्य अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे व सरचिटणीस अप्पासाहेब कुल यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. सध्या तांबे गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष आहेत. संजय शेळके यांनी मागील आठवड्यात या पदाचा राजीनामा दिला होता. तसेच राज्य शिक्षण परिषदेच्या झेंड्याखाली काम करण्याचा निर्णय घेतला.
तांबे हे गेल्या वीस वर्षापासून शिक्षक संघात कार्यरत असून दहा वर्ष त्यांनी संघाच्या कार्यालयीन चिटणीस तसेच सरचिटणीस पदावर काम केलेले आहे.गेल्या सहा वर्षापासून ते गुरूमाऊली शिक्षक मंडळाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पहात आहेत. त्यांचा जिल्ह्यातील शिक्षकांशी मोठा जनसंपर्क असून त्यांचे संघटनकौशल्य मोठे आहे.
म्हणून संघाचे राज्याचे नेते संभाजी थोरात,कार्याध्यक्ष अंबादास वाजे,नाशिक विभागीय अध्यक्ष आबा जगताप यांनी त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांचे जिल्हाभरातील शिक्षकांकडून अभिनंदन होत आहे