चिंबळी -चिंबळी फाटा (ता. खेड) येथील शांताई मेमोरियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये साध्यापद्धतीने श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी विद्यार्थी ऑनलाइन सहभागी झाले होते. अनुराग जैद-पाटील, अभिषेक जैद-पाटील, आदित्यराजे जैद-पाटील यांच्या हस्ते “श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी ऑनलाइन गणेश आरती, मंत्रपुष्पांजली, अथर्वशीर्ष स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच सोमवारी (दि. 24) हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.
यावेळी हुतात्मा राजगुरू यांचे राजगुरूनगरातील निवासस्थान ऑनलाइन विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले, असे प्राचार्या प्रिया बवले यांनी सांगितले.