राजगुरूनगर-हुतात्मा शिवराम हरि राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त व हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्धापनदिन निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 59 जणांनी रक्तदान केले.
हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील वाळुंज यांनी 105व्यांदा रक्तदान करून रक्तदानास सुरुवात केली. यावेळी खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील, जि. प. अध्यक्षा निर्मला पानसरे, खेड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष कैलास सांडभोर, राजगुरूनगर सहकारी बॅंकेचे अध्यक्ष गणेश थिगळे, पोलीस उपधीक्षक गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सुनील थिगळे, सुभाष होले, वैभव नाईकरे, हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष अमर टाटीया, कार्याध्यक्ष दिलीप होले, संचालक बाळासाहेब सांडभोर, राजन जांभळे, संतोष सांडभोर, राहुल वाळुंज, उत्तम राक्षे तसेच संचालिका मनीषा पवळे, संगीताताई तनपुरे, प्रितम गारगोटे व हेमंत विरकर, आकाश बोंबले उपस्थित होते.