पुणे – देशात सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या बॅंक ऑफ महाराष्ट्रने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर) मध्ये सलग सहाव्या महिन्यांत कपात केली आहे.
निवडक मुदतीसाठी आताच्या दराच्या तुलनेत ही कपात 10 बेसिस पॉईंटपर्यंत ( 0.10 टक्के) आहे व ती 7 सप्टेंबर 2020 पासून लागू असेल, असे बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
एक वर्ष आणि सहा महिने या मुदतींसाठी बॅंकेचा एमसीएलआर अनुक्रमे 7.30 टक्के (पूर्वी 7.40 टक्के) आणि 7.25 टक्के (पूर्वी 7.30 टक्के) इतका असेल, जो सध्याच्या बाजारपेठेच्या परिस्थितीत स्पर्धात्मक आहे. इतर मुदती उदा. एक दिवस, एक महिना आणि 3 महिने यासाठी एमसीएलआर अनुक्रमे 6.80 टक्के, 7.00 टक्के आणि 7.20 टक्के असेल. बॅंकेच्या एमसीएलआरमधील कपातीमुळे आर्थिक वृद्धी आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल.
दरम्यान, इंडियन ओव्हरसीज बॅंकेनेही आपल्या एमसीएलआर दरामध्ये 0.10 टक्क्यांची कपात केली आहे. बॅंकेने शेअरबाजाराला कळलेल्या माहितीत म्हटले आहे की, या बॅंकेचा एक वर्षासाठीचा एमसीएलआर आता 7.55 टक्के करण्यात आला आहे. आता बॅंकेचा तीन महिन्यांचा एमसीएलआर 7.45 टक्के करण्यात आला आहे तर सहा महिन्यांचा एमसीएलआर 7.55 टक्के असेल.