मुंबई – भारतात सुपरहिट झाल्यानंतर शाहरुखचा पठाण हा चित्रपट आता विदेशात देखील धुमाकूळ घालताना दिसत आहे. बांग्लादेशमध्ये देखील पठाणची जबरदस्त हवा पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर पठाणचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये बांग्लादेशी नागरिक थेट थिएटर्समध्ये पठाणच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चाहते थिएटरमध्ये झूम जो पठाण या गाण्यावर जबरदस्त नाचताना दिसत आहेत. यावरून विदेशात देखील शाहरुखच्या पठाणची किती क्रेझ आहे हे पाहायला मिळतय. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका थिएटरमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. जिथे मोठ्या पडद्यावर लोक नाचताना दिसत आहे.
#Pathaan craze in #Bangladesh#PathaanInBangladesh Mass Hysteria as audience dances to #JhoomeJoPathaan @SRKUniverseBD_ @iamsrk @deepikapadukone @TheJohnAbraham @yrf #SiddharthAnand #ShahRukhKhan #SRK pic.twitter.com/mBklJEEVWt
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) May 12, 2023
बॉलीवूडला लागलेले बॉयकॉटचे ग्रहण पठाण चित्रपटामुळे थांबले. भारतात पठाणने छप्पर फाड कमाई केली. आता पठाणची हवा विदेशातही पाहायला मिळत आहे. बांग्लादेशातील प्रेक्षकांचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, पठाणचे बांगलादेशातील तब्बल 41 थिएटरमध्ये 198 शोसह प्रदर्शित झाला आहे. तसेच ऍडव्हान्स बुकिंगमध्ये पठाण चार दिवस हाऊसफुल असल्याचे समजते.
#Pathaan ki Party Continues in #Bangladesh and even little kids can’t stop themselves from grooving to #JhoomeJoPathaan! ❤️ @SRKUniverseBD_ #PathaanInBanglandesh@iamsrk @deepikapadukone @TheJohnAbraham #SiddharthAnand#ShahRukhKhan #SRK pic.twitter.com/u8xs4C8RER
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) May 12, 2023
पठाणमध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम पठाणमध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहेत. त्याचवेळी, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. तर जगभरात या चित्रपटाने 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे.