केळी आणि गरम पाण्याने करू शकतो लठ्ठपणावर मात

सकाळी उठल्यानंतर नाश्‍त्याच्या वेळी केळी आणि त्यासोबत गरम पाणी या गोष्टी योग्य प्रमाणात घेतल्यास त्यामुळे लठ्ठपणा कमी करता येऊ शकतो, असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात सिद्ध झालंय. गरम पाणी आणि केळ यांच्यामुळे शरीराला एक विशिष्ट प्रकारचा शेप देण्यास मदत होऊ शकते.

साधारणत: कार्बोहायड्रेट्‌स आणि स्टार्चने भरपूर असलेला आहार लठ्ठपणा कमी करतो असे गणित आहे. त्यामुळे केळी आणि गरम पाण्यात या गोष्टी भरपूर प्रमाणात आहेत. यामुळे नाश्‍त्याच्या वेळी आपले पोट भरल्यासारखे तर वाटेल परंतु अतिरिक्‍त कॅलरीही आपल्या पोटात जाणार नाहीत.

आत्तापर्यंत करण्यात आलेल्या सर्वेमध्ये असे लक्षात आले आहे की, केळ हे शरीरातील मेटाबॉलिझम स्तर वाढविण्याचे कार्य करते. तसेच पचनक्रियाही सुधारते. त्यातील फायबर बद्धकोष्ठतेशी संबंधित तक्रारींनाही दूर करते. त्यामुळे सकाळी नाश्‍त्यासाठी केळ खाणे नेहमीच हितकर आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.