मेष : कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही त्यामुळे जे आहे त्यातून फायदा मिळवण्याकडे कल राहील.
वृषभ : व्यवसायात नवीन कामाच्या संधी दृष्टीक्षेपात येतील.पैशाचे व्यवहारात चोख रहा. अतिविश्वास ठेवू नका.
मिथुन : नोकरीत कोणावरही विसंबून राहू नका. स्वतःची आर्थिक व शारिरीक कुवत ओळखून मगच पुढे जा.
कर्क : आळसाने कामे लांबवलीत तर पुढे दुप्पट कामे करावी लागतील. घरात प्रियजनांच्या भेटीचे योग येतील.
सिंह : महत्वाचे निर्णय घेताना महिलांना जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. तरुणांना प्राविण्य दाखवता येईल.
कन्या : कामात बदल करुन विस्तार करण्याचा विचार करा. आवश्यक वाटल्यास मध्यस्थांचा उपयोग होईल.
तूळ : व्यवसायात आर्थिक आवक फार नसली तरी केलेल्या कामाचे समाधान मिळेल.
वृश्चिक : जुनी येणी वसुल करण्यावर भर राहील. खर्चासाठी तात्पुरता बचतीतील पैशाचा वापर करावा लागेल.
धनु : नोकरीत कामाचा ताण वाढेल. त्यामुळे दगदग धावपळ होईल. चिडचिड वाढेल.
मकर : वरिष्ठ कामात सवलतीचे आश्वासन देतील. घरात महत्वाचे निर्णयात तुमचा पुढाकार राहील.
कुंभ : तरुणांना कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. महिलांना लांबच्या प्रवासाचे योग येतील.
मीन : या सप्ताहात मिळालेल्या संधीचे सोने करा. जास्तीत जास्त लाभ घेण्याकडे कल राहील.