सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचे लीड रोल असलेल्या “शेरशाह’ला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते आहे. हा सिनेमा बघणाऱ्यांपकी क्वचितच एखाद्याने निगेटिव्ह कॉमेंट केल्या असाव्यात.
भारत-पाकिस्तानदरम्यानच्या कारगिल युद्धाच्या वेळी कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शौर्य आणि बलिदानाची ही कहाणी आहे. हा सिनेमा बघताना भारतीय प्रेक्षकांकडून देशभक्तीची उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त होते आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानातील प्रेक्षकांकडूनही या सिनेमाचे कौतुक होताना दिसते आहे.
या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन विक्रम बत्रा आणि त्यांचा जुळा भाऊ विशाल बत्रा यांचाही रोल केला आहे. हा सिनेमा भारत पाकिस्तानच्या युद्धावर आधारलेला असल्याने स्वाभाविकच त्यावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
मात्र, सिनेमाचे अनेक व्हिडीओ यू-ट्युबवर पोस्ट करण्यात आले आहेत. हे व्हिडीओ बघूनच पाकिस्तानातील प्रेक्षकांनी हा सिनेमा बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
काही प्रेक्षकांनी या सिनेमाची एखादी व्हिडीओ लिंक शेअर करण्याची विनंतीही कॉमेंटमध्ये केली आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांचे माता-पिता देखील हा सिनेमा बघून खूप भावूक झाले होते.