नवी मुंबई – – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मागील वर्षी बॉलीवूड अनेक सेलेब्सची ड्रग्स प्रकरणात कसून चौकशी केली होती. तर आता ईडीकडून चार वर्षे जुन्या ड्रग्ज प्रकरणात टॉलीवुडचे टॉप अभिनेते, अभिनेत्री आणि डायरेक्टर्सना समन्स पाठविला आहे.
यामध्ये अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, बॉलिवुडमधील गाजलेला व्हिलन भल्लालदेवची भूमिका साकारणारा राणा दग्गुबाती, पुरी जगन्नाथ यांना संबंधित तारखांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. चार वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात आतापर्यंत 12 लोकांना नोटीस पाठविण्यात आली आहे. 6 सप्टेंबर ते ३१ सप्टेंबर या तारखांमध्ये या सेलेब्सला ईडीने हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
तत्पूर्वी, 2017 मध्ये एका प्रसिद्ध बारवर छापा टाकला होता. या ठिकाणी झालेल्या झाडाझडतीनंतर वेगवेगळी 12 प्रकरणे समोर आली होती. या प्रकरणांवर 11 चार्जशीट दाखल करण्यात आल्या आहेत.