बालेवाडी क्रीडा संकुल 2 महिन्यांचे वीजबिल 33 लाख रु.

पुणे – म्हाळुंगे-बालेवाडी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे एप्रिल-मे 2019 या 2 महिन्यांचे वीजबिल 33 लाख 33 हजार इतके आले आहे. हे बील 1 कोटींच्या तरतुदीमधून देण्यास राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे. देशातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी 1994 साली म्हाळुंगे-बालेवाडी परिसरातील 151 एकर परिसरात शिवछत्रपती क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांनंतर या संकुलाचा वापर राज्यातील विविध क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी केला जात आहे. याशिवाय याठिकाणी क्रीडाविषयक विविध उपक्रमदेखील राबविले जातात.

दरम्यान, 2008 मध्ये याठिकाणी झालेल्या तिसऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमुळे क्रीडानगरीतील अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या सर्व सुविधांचा नियमितपणे वापर केला जात असल्याने, या सर्व सुविधांवर देखभाल दुरुस्तीचा खर्च शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला करावा लागत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)