भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब बेंडे

मंचर / पारगाव शिंगवे -पारगाव – दत्तात्रयनगर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब बेंडे यांची बिनविरोध निवड गुरुवारी (दि. 30) करण्यात आली. कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे विद्यमान अध्यक्ष होते. परंतु त्यांची राज्यमंत्री मंडळात वर्णी लागल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. रिक्‍त झालेल्या अध्यक्षपदासाठी बाळासाहेब बेंडे पाटील यांनी नामनिर्देशन पत्र भरले.

अध्यक्षपदासाठी बाळासाहेब बेंडे पाटील यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक पी. एस. रोकडे यांनी काम पाहिले.

यावेळी कारखान्याचे संचालक देवदत्त निकम, अशोक घुले, प्रदीप वळसे पाटील, रामचंद्र ढोबळे, संचालक अक्षय काळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, दगडु शिंदे, ज्ञानेश्‍वर गावडे, शांताराम हिंगे, बाळासाहेब थोरात, अण्णासाहेब पडवळ, भगवान बोऱ्हाडे, तानाजी जंबुकर, ज्ञानेश्‍वर अस्वारे, कल्पना गाढवे, मंदाकिनी हांडे, रमेश कानडे, रमेश लबडे, उत्तम थोरात, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.