वाल्हे – कामठेवाडी (ता. पुरंदर) येथील अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी बालआनंद मेळावा भरवण्यात आला होता. सुकलवाडीच्या सरपंच जयश्री चव्हाण व सदस्य चंद्रशेखर दुर्गाडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या बाजारामध्ये विविध प्रकारच्या ताज्या भाज्या, फळे, विविध खाद्या पदार्थ आदींची दुकाने विद्यार्थ्यांनी थाटली होती. यावेळी जयवंत भुजबळ, प्रदीप दुर्गाडे, अनिल दुर्गाडे, योगेश भुजबळ, अंकुश दुर्गाडे, नितीन बुनगे, शाळा व्यवस्थापन समितीचे दिपक दुर्गाडे, तात्याबा मदने, दत्तात्रय बुनगे, रोहन दुर्गाडे, बाळू चव्हाण, सचिन दुर्गाडे, संतोष दुर्गाडे, अमोल बुनगे, दादा दुर्गाडे, चंद्रकांत दुर्गाडे, पोपट दुर्गाडे यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी, तसेच ग्रामस्थांनी बाजाराला भेटी दिल्या.
सर्व विद्यार्थ्यांचा शेतमाल दोन तासांमध्ये खपल्याचे , सहशिक्षिक प्रवीण किर्वे यांनी सांगितले. शालेय जीवनातच मुलांना व्यवहार ज्ञानाचे आकलन व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविल्याचे मुख्याध्यापक मुकुंद गाडे यांनी सांगितले. अंगणवाडी सेविका ज्योती दुर्गाडे यांनी बाजारामध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्रामस्थांचे आभार मानले.