बांगलादेशमध्ये गॅस पाइपलाइनमध्ये स्फोट, 7 जणांचा मृत्यू

ढाका: दक्षिण-पश्चिम बांगलादेशातील रविवारी एका घरात गॅस पाइपलाइनमध्ये झालेल्या स्फोटात सुमारे सात जण ठार आणि आठ जण जखमी झाले. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. चट्टोग्राम शहरातील पाथरघाट येथील पाच मजली इमारतीच्या तळ मजल्यावर हा स्फोट झाला असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

या स्फोटामुळे इमारतीची बाहेरील भिंत कोसळली आणि तेथून जाणाऱ्या पादचाऱ्यांना दुखापत झाल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी या स्फोटात इमारतीच्या समोरील एका दुकानाचेही नुकसान झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या स्फोटमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

जेथे स्फोट झाला त्या इमारतीच्या जवळून गॅस पाईपलाईन गेली आहे. पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, गॅस राइजर (पाईप) मध्ये समस्या असू शकते किंवा स्फोट सकाळच्या स्वयंपाकाच्या कारणामुळे किंवा सिगारेटमुळे झाला असावा.

Leave A Reply

Your email address will not be published.