नवी दिल्ली – टाटा मोटर्स कंपनीने दिल्ली येथे त्यांच्या पाचव्या रजिस्टर्ड वेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटीचे (आरव्हीएसएफ) उद्घाटन केले. या केंद्राचे उद्घाटन टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. (Tata Motors opens fifth registered vehicle scrapping facility )
या केंद्रामध्ये पर्यावरणदृष्टया अनुकूल प्रक्रियांचा वापर केला जातो. या केंद्राची दरवर्षाला 18,000 एण्ड-ऑफ-लाइफ वेईकल्स सुरक्षितपणे विघटन करण्याची क्षमता आहे. जोहार मोटर्ससोबत सहयोगाने विकसित करण्यात आलेले आरव्हीएसएफ सर्व ब्रॅण्ड्सच्या प्रवासी व व्यावसायिक वाहनांचे जबाबदारपूर्वक स्क्रॅपिंग करते. जयपूर, भुवनेश्वर, सुरत व चंदिगड येथे टाटा मोटर्सच्या चार आरव्हीएसएफना यश मिळाल्यानंतर हा मोठा टप्पा लाँच करण्यात आला आहे.
गिरीश वाघ म्हणाले, आमचे पाचवे स्क्रॅपिंग केंद्र शाश्वत पद्धती आणि जबाबदारपूर्वक वेईकल विघटन करून देण्याच्या दिशेने पाऊल आहे. स्क्रॅपमधून मूल्य निर्मितीचे ध्येय आमच्या चक्रीय अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाशी संलग्न आहे. हे अत्याधुनिक केंद्र वाहनांचे जबाबदारपूर्वक विघटन करण्यामध्ये आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी मार्ग मोकळा करेल.
येथे टायर्स, बॅटर्या, इंधन, ऑईल्स, लिक्विड्स व गॅसेस् अशा विविध घटकांच्या सुरक्षित विघटनासाठी समर्पित स्टेशन्स आहेत. प्रत्येक वेईकल विशेषत: पॅसेंजर व कमर्शियल वेईकल्सच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन केलेल्या प्रखर डॉक्युमेन्टेशन व विघटन प्रक्रियेमधून जातात. सर्व घटकांच्या सुरक्षित विघटनाची खात्री मिळते.