पुणे : प्रधानमंत्री घरकुल योजनेतंर्गत आलेले अनुदान मिळवून देण्यासाठी तेरा हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या ग्रामसेवकाला सत्र न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी 15 हजाराचा जामीन मंजुर केला आहे.
श्रीनिवास शंकरराव माने (वय 34, रा. जांभुळवाडी, मूळ. बीड) असे त्या ग्रामसेवकाचे नाव आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. विवेक भरगुडे, ऍड. कुमार पायगुडे, ऍड. राकेश ओझा आणि ऍड. गणेश शेंडकर यांनी काम पाहिले. वेल्हा तालुक्यातील पाल बुद्रुक येथील 29 वर्षीय व्यक्तीने याबाबत तक्रार दिली आहे.
तक्रारदारांच्या वडिलांना घरकुल योजनेतंर्गत घर मिळाले होते. त्यानुसार त्यांना 1 लाख 20 हजार अनुदान मिळणार होते.
त्यापैकी 15 हजार मिळाले असून, दुसऱा हप्ता 45 हजार रुपये मिळण्यासाठी 15 हजारांची लाच मागताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माने याला अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने ऍड. विवेक भरगुडे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला.