Elvish Yadav – बिग बॉस ओटीटी-२ चा विजेता एल्विश यादव गेल्या काही दिवसांपासून त्याच्या अटकेमुळे चर्चेत आहे. सापाच्या विषाचा पुरवठा केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी त्याला पाच दिवसांपूर्वी अटक केली होती. याप्रकरणी एल्विश यादवला आज (२२ मार्च रोजी) जामीन मंजूर झाला आहे.
रेव्ह पार्टीत सापाचे विष पुरवल्याप्रकरणी रविवारी १७ मार्च रोजी एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी एल्विशला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
एल्विशने रेव्ह पार्ट्यांमध्ये साप आणि सापाच्या विषाचा पुरवठा केल्याची कबुली दिल्याचे म्हटले जात होते. याचदरम्यान आता एल्विशला जामीन मिळाला आहे. । Elvish Yadav । Snake Venom Case
एल्विशच्या पहिल्या जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नव्हती. मात्र आता वकिलाने दाखल केलेल्या दुसऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने एल्विशचा जामीन मंजूर केला आहे.