महापालिका हीरक महोत्सव महाराष्ट्र – नागरी स्वच्छता अभियान राबविणार

कोल्हापूर : 1 मे 2020 रोजी महराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक मोहोत्सव साजरा होत आहे. या निमित्तत स्वच्छ, सुंदर व हरीत महाराष्ट्राची संकल्पना साकारण्यासाठी दि.1 मार्च 2020 ते 30 एप्रिल 2020 या कालावधीत राज्यातींल सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हीरक महोत्सवी महराष्ट्र नागरी स्वच्छता अभियान राबविण्यास शासन मान्यता झाली आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवंर राज्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. याबाबत आज आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधीत अधिका-यांची आयुक्त कार्यालयात आढावा बैठक आयोजीत केली होती.
हे अभियान राज्यांमधील शहरांमध्ये शहरातील घनकच-याचे व्यवस्थापन करणे, शहरात निर्माण होणा-या घनकच-याचे 100 टक्के संकलन करणे, घनकच-याचे विलगीकरणचे प्रमाणे वाढविणे, विलगीकृत घनकच-यांवर 100 टक्के प्रक्रिया करणे, बांधकाम आणि पाडकाम कचरा (खरमाती) दंडात्मक कारवाई व नियोजन व शहर सौंदर्यीकरण या मुद्यांवर  प्रभावणीपणे राबविण्यात येणार आहे.
यासाठी हीरक महोत्सवी महाराष्ट्र  नागरी स्वच्छता अभियान अंतर्गत निधीची तरतुद आहे. आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या अभियनाची अंमलबजावणी करणेच्या सूचना सर्व संबंधीत अधिका-यांना दिल्या.
तसेच आपले शहर प्रदुषण मुक्त होणेबरोबरच ते अधिकाअधिक हरीत व सुंदर दिसण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत असे सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त निखील मोरे, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, सहा.आयुक्त अवधुत कुंभार, चेतन कोंडे, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील, पर्यावरण अभियंता समीर वाघ्रांबरे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहूल राजगोळकर आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.