पुणे (प्रतिनिधी) – लॉकडाऊनच्या काळात सिगारेट आणि तंबाखूची चोरून विक्री केल्याप्रकरणात न्यायालयाने चौघांना जामीन मंजूर झाला आहे. रोहीत सिताराम प्रजापती (वय २३, रा. महाल्क्षमी काॅम्लेक्स, शिवणेगांव, पुणे), विजय सिताराम प्रजापती (वय २५), पंकज शिवनारायण प्रजापती (वय २२ दोघे रा.शिवणेगाव ), मुकेश पारसमल छाजेड (वय ४०, रा. ८८० सहकारनगर, पुणे) त्या चौघांची नावे आहेत.
बचाव पक्षातर्फे अॅड. आकाश मुसळे, अॅड. अभिजित पोळ आणि अॅड. अभिनव साळुंके यांनी काम पाहिले. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटारी, सिगारेट आणि तंबाखू असा एकूण १४ लाख ४१ हजार २ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
युनिट एकच्या पथकातील पोलीस नाईक सचिन जाधव यांना शिवणे येथे चोरून सिगारेट आणि तंबाखू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे यांच्यासह सचिन जाधव, पोलीस कॉन्स्टेबल गजानन सोनावणे, पोलीस नाईक वाघावले यांच्या पथकाने शिवणे येथील महालक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करून अटक केली. सर्वांना पुढील कारवाईसाठी उत्तमनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. तेथून चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.