पुणे – चाइल्डसेंट्रिक होम्स ही एक अभिनव संकल्पना आहे, ती मुलांना त्यांची आवड निवडण्याचे स्वातंत्र्य देते. गेराच्या बालविकासाभिमुख दृष्टीचा एक भाग असल्याने मला प्रचंड आनंद मिळतो. यामुळे मी तरुण बॅडमिंटनपटूंच्या जवळ जाईन आणि पुण्यातील नवोदित प्रतिभा ओळखू शकेन, असे मत भारताचा माजी ऑल इंग्लंड बॅडमिंटन विजेता व प्रशिक्षक पुलेला गोपीचंद याने व्यक्त केले आहे.
गेरा डेव्हलपमेंट्सचा वारसा आणि या पुरस्कार विजेत्या संकल्पनेत महेश भूपती, अनिल कुंबळे, बायचुंग भुतिया, शंकर महादेवन, दीपा कर्माकर आणि श्यामक दावर यांसारख्या दिग्गजांशी निगडित असणे हा खरोखर माझा विशेषाधिकार आहे, असेही तो म्हणाला.
गेरा डेव्हलपमेंट्सने या वर्षी मीट द चॅम्पियन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात सहभागी होण्यासाठी गोपीचंद पुण्यात आला होता. त्याने विविध खेळाडूंशी तसेच उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी गेरा डेव्हलपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा उपस्थित होते.