Badminton Asia Team Championships 2024 (Malaysia) – दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिच्यासह अस्मिता छलिया व अश्विनी पोनाप्पा आणी तनिषा क्रास्टो यांच्या एकत्रीत यशामुळे भारतीय बॅडमिंटन संघाने आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात उपांत्य फेरी गाठली.
भारतीय संघाने उपांत्यपूर्वफेरीच्या लढतींत बलाढ्य हॉंगकॉंगचा ३-० असा दणदणीत पराभव केला व पहिल्यांदाच या स्पर्धेच्या इतिहासात पदक निश्चिती केली. आता उपांत्य सामन्यात भारताचा सामना चीन व जपान यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
Friday Fever at its peak 🥳 as women shuttlers secure their maiden medal at #BadmintonAsiaTeamChampionships2024🏸🥳
Our Women’s team waltzed into into Semis defeating Hong Kong 🇭🇰 3-0
This is huge girls 😍 Many congratulations on scripting history 🎉👏👏 pic.twitter.com/VDElMldZqe
— SAI Media (@Media_SAI) February 16, 2024
सिंधूला महिला एकेरीचा सामना जंकताना खूप संघर्ष करावा लागला. मात्र, अनुभवाच्या जोरावर तीने हॉंगकॉंगच्या लोउ सीन यान हॅपी हीच्यावर २१-७, १६-२१, २१-१२ अशी तीन गेममध्ये मात केली. महिलांच्या दुहेरीत भारताच्या तनिषा व पोनाप्पा जोडीने हॉंगकॉंगच्या येउंग न्गा टींग व येउंग पेइ लाम या जोडीवर २१-१०, २१-१४ असा अवघ्या ३५ मिनिटांत विजय मिळवला.
परतीच्या एकेरीत अस्मिताने आपले वर्चस्व प्रस्थापीत करताना हॉंगकॉंगच्या येउंग सुम येइ हीचा २१-१२, २१-१ असा पराभव केला व संघाला ३-० असा दीमाखदार विजय प्राप्त करुन दिला.