बबिता फोगट बनली क्रीडा उपसंचालक

नवी दिल्ली – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू बबिता फोगट हिची हरियाणा राज्य सरकारने क्रीडा विभागाच्या उपसंचालक पदावर नियुक्‍ती केली आहे.

बबितासह डब्ल्यूडब्ल्यूईमधील कुस्तीपटू कविता दलाल हिची देखील या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. हरियाणा सरकारने या दोघींना क्रीडा विभागाच्या उपसंचालक पदावर नियुक्‍त केल्याचे पत्र दिले आहे. कविता दलाल एक भारतीय कुस्तीपटू असून ती वर्ल्ड रेसलिंग एटरटेन्मेंट (डब्ल्यूडब्ल्यूई) स्पर्धेत सहभागी होणारी पहिलीच भारतीय कुस्तीपटू ठरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.