लोणी देवकर, (वार्ताहर) – इंदापूर तालुक्यातील रुई येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बाबीर देवाची माघी यात्रा असणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख अजितसिंह पाटील यांनी माहिती दिली.
यामध्ये सकाळी देवाची पालखी गावातून प्रस्थान करेन त्यानंतर देवाची महापूजा व अभिषेक करून यात्रेस प्रारंभ होईल. आजचा (गुरुवार) यात्रेचा मुख्य दिवस असेल. भाकणुकीच्या कार्यक्रमाने यात्रेची सांगता होईल.
या यात्रेनिमित्त देवस्थान समिती तसेच ग्रामपंचायतच्या वतीने पाणी रस्ते आदींची शोक व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरण लोणी देवकर शाखा यांनी देखील व्यवस्था केली आहे. दिवाळीमध्ये होणार्या जत्रेला ज्या भाविकांना हजेरी लावता येत नाही. ते भाविक या मागे यात्रेला आवर्जून हजेरी लावतात.