ओझर, (वार्ताहर) – संकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी लाखो भाविकांनी विघ्नहर्ता गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले. अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर येथे पहाटे 5 वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, सचिव दशरथ मांडे, विश्वस्त राजश्री कवडे व ग्रामस्थ यांच्या हस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून दर्शानासाठी मंदिर खुले करण्यात आले.
मंदिरामध्ये चतुर्थी निमित्त महाआरती करण्यात आली. महाआरतीचा मान गणेशभक्त आमित बेंडे, प्रफुल्ल गावडे, प्रसाद पानसरे, विशाल पागडे, प्रणेश कवडे यांना मिळाला.
पहाटे पाच ते रात्री आकरापर्यंत रांगेत सुमारे एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी 7.30 वा. व दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी 8 वाजता नियमित पोथी वाचन करण्यात आले. सकाळी 10.30 वाजता श्रींना नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप करण्यात आली.
विघ्नहराला रेशमी जरीचा पोशाख व श्री विघ्नहरासमोर सोन्याचे अलंकारांची सजावट करण्यात आली . तसेच सोन्याचे अलंकार श्री विघ्नहराला परिधान करण्यात आले. सायंकाळी 7 वाजता नियमित हरिपाठ करण्यात आला. व चंद्रोदयापर्यंत कीर्तनकार ज्ञानेश्वरीताई कोंडे धामणखेल यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना साथसंगत राम प्रसादिक भजनी मंडळा शिरोली यांनी दिली.
सायंकाळी 7 वा धुपारती होऊन रात्री 10.30 वाजता शेजआरती करून 11 वाजता मंदिर बंद करण्यात आले. महाआरतीच्या मानकरी यांनी विकास कामात यांना मिळाला. भाविकांचे स्वागत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, सचिव दशरथ मांडे, खजिनदार कैलास घेगडे, विश्वस्त बी. व्ही. मांडे, रंगनाथ रवळे, आनंद मांडे, किशोर कवडे, मंगेश मांडे, गणपत कवडे, कैलास मांडे, मिलिंद कवडे, विजय घेगडे, श्रीराम पंडित, राजश्री कवडे यांनी केले.