-->

बाबा रामदेव यांचा पुन्हा एकदा दावा ; म्हणाले, “आमच्या औषधाने कोरोना रुग्ण होतो तीन दिवसात बरा”

रामदेव बाबांनी केले कोरोनावर मात करणारे आणखी एक औषध लाँच

नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा कोरोनावर मात करणारे औषध तयार केला असल्याचा दावा केला आहे. यावेळी तयार करण्यात आलेल्या औषधाने कोरोना रुग्ण हा केवळ तीन दिवसात पूर्णपणे बरा होतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, रामदेव बाबा यांनी कोरोनावर मात करण्यासाठी रामबाण उपाय शोधल्याचा दावा केला आहे. त्यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणखी एक औषध लाँच केले आहेत. शुक्रवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील एका कार्यक्रमात रामदेवबाबांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.

बाबा रामदेव यांनी अशी घोषणा केली की पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटमुळे कोव्हिडवर उपचार होतील. त्यांनी असा दावा केला आहे की, आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅबलेटला एक सहाय्यक औषध म्हणून मंजुरी दिली आहे.

याआधी रामदेव बाबांनी कोरोनिलला केवळ रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठीचे बुस्टर म्हटले होते. आता रामदेव बाबांनी कोरोनिलला CoPP – WHO GMP च्या प्रोटोकॉल आणि सर्टिफिकेशन सिस्टमनुसार सहाय्यक औषध घोषित केले आहे. पतंजलीकडून असा दावा केला जात आहे की 70 टक्के रुग्ण तीन दिवसात या औषधाच्या वापरामुळे बरे होतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.