मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले शिवजन्मस्थळाला अभिवादन

जुन्नर – छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या 391व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार किल्ले शिवनेरीवरील शिवजन्मस्थळाला अभिवादन करण्यासाठी केले आहेत. यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवजन्मसोहळा पार पडला. खासदार अमोल कोल्हे व राज्य मंत्रीमंडळातील काही सहकारी देखील त्यांच्यासोबत आहेत.

 

दरम्यान, किल्ले शिवनेरीवर राज्यातील विविध भागातून शिवज्योतीचे आगमन होत असते; मात्र कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे तसेच कलम 144 लागू केले आहे. शासनाच्या या प्रतिबंधात्मक आदेशामुळे जरी मर्यादा येत असल्या तरी परंपरेमध्ये कोणत्याही स्वरूपाचा खंड पडणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली आहे. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.