मुंबई – मशिदीवरील भोंग्यांच्या विषयाला हात घालत मनसैनिकांना हनुमान चालीसाचे स्पीकर लावण्याचं आवाहन केलं. राज ठाकरेंच्या या भाषांतर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. यावर आता गायिका अनुराधा पौडवाल आजच्या तरुण पिढीला एक संदेशही दिला आहे. त्या पत्रकरांशी बोलतांना म्हणाल्या,“मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मात्र भारतात विनाकारण वाढवून प्रचार केला जातो. लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात अजान वाजवली जाते. त्यामुळे इतरांना वाटते की, आपणही आपला लाऊडस्पीकर का वाजवू नये?” असा प्रश्न त्यानी उपस्थित केला.
View this post on Instagram
त्या पुढे म्हणाल्या की, मी जगातील अनेक देशांमध्येही गेले आहे, जिथे लाऊडस्पीकरवर बंदी आहे. मुस्लिम देशांमध्ये लाऊडस्पीकरवर अजान वाजवली जात नाही, मग आपल्या देशात का? असा रोखठोक सवालही त्यांनी केला.
View this post on Instagram
दरम्यान,म नसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरणात एकाच खळबळ उडाली आहे.