आयुष्मान खुराना द्वारा अभिनीत अनुभव सिन्हा यांचा आगामी “अनेक’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 17 सप्टेंबर 2021 रोजी चित्रपटगृहात रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे अंतिम टप्प्यातील शुटिंग सध्या उत्तर-पूर्व भागात सुरू आहे.
“अनेक’ या चित्रपटातून अनुभव आणि आयुष्मान यांची हिट जोडी पुन्हा वापसी करत आहे. विशेष करून अभिनेता आणि दिग्दर्शक यांची ही जोडी प्रसिद्ध असल्याने चाहत्यांमधील उत्साह वाढला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आलेला आयुष्मानचा “जोशुआ’ चर्चेचा विषय ठरला होता.
देशातील उत्तर-पूर्व भागावर आधारित असलेल्या या पहिल्या चित्रपटासाठी निर्मात्यांनी हॉलीवूडमधील ऍक्शन डायरेक्टर स्टीफन रिक्टर यांच्यावर चित्रपटातील ऍक्शन सीनची जबाबदारी सोपविली आहे. यापूर्वी शाहरुख खान याच्या “डॉन-2′ आणि रेयान रेनॉल्ड्सच्या “द हिटमॅनस बॉडीगॉर्ड’ या चित्रपटासाठी त्यांनी ऍक्शन सीन सुट केलेले आहे.
“अनेक’ हा बॉलीवूडमधील बीग बजेट असलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट असल्याचे मानले जात आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचे बॅक-टू-बॅक चित्रपट चाहत्यांसाठी मोठा उत्साह वाढविणारे ठरत आहे. यापूर्वी “आर्टिकल 15′ आणि “थप्पड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमविला होता. आता “अनेक’ चित्रपट 17 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असल्याने चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे.