मुंबई -अभिनेता आयुष शर्मा सध्या “अंतिम- द फायनल ट्रुथ’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. 26 नोव्हेंबरला रिलीज होणाऱ्या या सिनेमात तो महिमा मकवानाबरोबर दिसणार आहे. महिमा मकवानाचा हा बॉलीवूडमधील पहिलाच सिनेमा असणार आहे.
“अंतिम’मध्ये आयुष आणि महिमामध्ये काही इंटिमेट सीनदेखील आहेत. हे सीन करताना आयुषची स्थिती खूपच वाईट झाली होती. अलीकडेच दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये आयुषने ही फजिती सांगितली.
या सीनच्यावेळी आपल्या मनात वारंवार पत्नी अर्पिता आणि आपल्या मुलांचा विचार येत होता. त्यामुळे सीन करताना तो खूपच नर्व्हस झाला होता. त्याला कामावर लक्ष केंद्रित करता येत नव्हते, असे त्याने सांगितले.
एक किसिंग सीन करायला लागणार असल्याचे डायरेक्टर महेश मांजरेकरने सांगितल्यावर तो अगदीच गडबडून गेला. हा सीन रद्द करण्याची विनंती करू लागला.
त्याने याबाबत महिमा मकवानालाही विनंती केली, पण हा महेश मांजरेकरने केलेला एक विनोद होता, हे आयुषला नंतर समजले. “अंतिम’मध्ये सलमान खान, निकीतन धीर आणि सचिन खेडेकर देखील असणार आहेत.