पुणे -महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी 2 नोव्हेंबर, तर बॅंकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यास 3 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
मात्र, काही उमेदवारांनी परीक्षा शुल्काचा भरणा करूनही त्यांचे शुल्क बॅंकेकडून स्वीकारले गेले नसल्याच्या तक्रारी आयोगास प्राप्त झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर परीक्षा शुल्काचा भरणा करू न शकलेल्या व परीक्षा शुल्काचा भरणा करूनही त्यांच्या खात्यामध्ये फी पेड’
असा शेरा दर्शवित नसलेल्या उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा अयोगाकडून देण्यात आली आहे.