नेवासा, (प्रतिनिधी) – भारतीय शुगर संशोधन संस्था, कोल्हापूर या संस्थेचा देशपातळीवरचा बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को-ऑपरेटिव्ह शुगर मिल अँवार्ड हा साखर उद्योगातील अमूल्य योगदान असलेल्या व सर्वांगीण विकासात आघाडीवर असलेल्या भेंडे येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना जाहीर झालेला आहे.
कोल्हापूर येथे विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे तज्ञ संचालक डॉ.क्षितिज घुले पाटील, व्हाईस चेअरमन पांडूरंग अभंग, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, संचालक काकासाहेब नरवडे, अॅड.हिंम्मत देशमुख आदी उपस्थित होते.