बारामती (प्रतिनिधी) – वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडनकड़ून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात करोनामुक्तीसाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून “सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट (स्वीझरलंड) पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्चे यूरोप चे अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाख़ाली जगभरात ७० देशामध्ये करोनामुक्तीसाठी जनजागृती केली जात आहे. तसेच करोनामुक्तीसाठी कार्य करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी सदर संस्थेमार्फत व्यक्ती व संस्थांना सम्मानित करण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेले धडाडीचे व झटपट निर्णय , वैद्यकीय सुविधा प्राप्त करून देण्यासाठी केलेले कार्य आदी कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार दिला गेला आहे.
या उपक्रमाअंतर्गत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडनचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर दीपक हरके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात उपमुख्यमंत्री दालनात सदर पुरस्काराने
सम्मानित करण्यात आले.