पुणे,वाघोली – आव्हाळवाडी तालुका हवेली येथील युवा नेते अविनाश बापूसाहेब सातव पाटील यांची भाजपा युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे यांच्या हस्ते सातव यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
पुणे येथे अविनाश सातव पाटील यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे माजी मंत्री संजय भेगडे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष किरण दगडे पाटील, भाजप नेते धर्मेंद्र खांडरे पाटील, सिने अभिनेते प्रवीण तरडे, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप सातव आदी मान्यवर उपस्थित होते.
युवकांना संघटित करून त्यांचे प्रश्न शासनाच्या व पक्षाच्या माध्यमातून सोडविणार असल्याचे अविनाश सातव पाटील यांनी यावेळी सांगितले. अविनाश सातव पाटील यांच्या निवडीबद्दल हवेली तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील,माजी महापौर मुरलीधर मोहोळ, बाबाराजे जाधवराव, जगदीश मुळीक, रोहिदास उंद्रे, प्रदीप कंद, संदीप भोंडवे,सुदर्शन चौधरी, गणेश कुटे, प्रदीप सातव, नटराज सातव पाटील, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.