मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाची युती होणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट झाल्याच्या बातम्या समोर आल्या आणि नवीन चर्चांना उधाण आले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत सर्व बाबींचा खुलासा केला आहे.शिंदे यांच्यासोबतच्या युतीच्या चर्चांना यावेळी आंबेडकर यांनी पूर्णविराम दिला आहे.
आमची युतीबाबतची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट मत यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. आमची युती शिंदे गटाशी होणार नाही,आमची युती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेसोबत होणार आहे. ठाकरे आणि माझ्यात त्याबाबत कमिटमेंट झाली असल्याचा खुलासा देखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच मुख्यमंत्री शिंदेसोबत काल भेट झाली असल्याचे देखील आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. पण आम्ही आमच्या पक्षाच्या भूमिकेवर ठाम आहे. आम्हाला शिवसेनेसोबत युती करायची आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहोत अशी माहिती यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी दिली. भाजप ज्या पक्षासोबत आहे त्या पक्षासोबत युती करायची नाही हे आमचं ठरलं असल्याचं देखील आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
भाजप ज्या पक्षासोबत आहे, त्या पक्षासोबत युती करायची नाही हे आमचं ठरलेलं आहे
आमचं भाजप आणि संघासोबत व्यवस्थेचं भांडण आहे
आम्ही शिवसेनेसोबत जाणार आहोत. युतीबाबत शिवसेनेशी चर्चा झाली आहे,फक्त जाहीर करण बाकी आहे.
भाजप सोडली तर शिंदे सोबत जाऊ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काल भेट झाली.