भारतातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्पने सादर केलेल्या हिरो डेस्टिनी या वाहनाला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर या कंपनीने 125 सीसी गटात हिरो माएस्ट्रो एड्ज 125 हे वाहन सादर करून या क्षेत्रात अधिक आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे ठरविले आहे. अर्थात, हिरो माएस्ट्रो एड्ज 125 बऱ्याच प्रमाणात माएस्ट्रो एड्ज 110 सारखी दिसते. मात्र, हिरो माएस्ट्रो एड्ज 125 कार्यक्षमतेत थोडी सरस आहे. त्याचबरोबर इतरही अनेक बदल करण्यात आलेले आहेत.
हिरो माएस्ट्रो एड्ज 125 चे डिझाईन तरुण आणि तरुणींना आकर्षित करण्यासाठी करण्यात आले आहे. या वाहनासाठी सहा रंग उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याचबरोबर हे रंग तरुणांना आवडतील असे आहेत. हिरो माएस्ट्रो एड्ज 125 फ्युअल इंजेक्टेड आणि कर्बरेटेड प्रकारामध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. कर्बरेटेड हिरो माएस्ट्रो एड्ज 125 ड्रम आणि डिस्क ब्रेक उपलब्ध करण्यात आलेली आहे. मात्र, फ्युअल इंजेक्टेड वाहन फक्त फ्रंट डिस्क ब्रेकमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.
हिरो माएस्ट्रो एड्ज 125 ही गाडी 124.6 सीसी सिंगल सिलिंडर इंजिनची आहे. कर्बरेटेड वाहनाची इंधन कार्यक्षमता बरीच चांगली आहे. त्याचबरोबर या वाहनाच्या इंधनाची टाकी साडेपाच लिटरची आहे तर फ्युल इंजेक्टेड वाहनाची टाकी पाच लिटरची आहे. कर्बरेटेड वाहनाची इंधन कार्यक्षमता 53.1 कि.मी. प्रति लिटर तर फ्युअल इंजेक्टेड वाहनाची कार्यक्षमता 51 कि.मी. प्रतिलिटर आहे. हिरो माएस्ट्रो एड्ज 125 ड्रम ब्रेकसह 58500 ते 60000 रुपयांदरम्यान उपलब्ध आहे.