‘दैनिक प्रभात’तर्फे आयोजन : तिसऱ्या दिवशी मेळाव्यात ग्राहकांचा प्रचंड सहभाग
शिरूर -“दैनिक प्रभात’च्या वतीने शिरूर येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या मैदानावर भव्य वाहन मेळावा (ऑटो झोन) आयोजित करण्यात आला आहे. या वाहन मेळाव्यास तिसऱ्या दिवशी नागरिक, ग्राहकांनी वाहन मेळाव्यास भेट दिली. या वाहन मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला. संपूर्ण मेळावा परिसर नागरिकांनी गजबजून गेला होता.
दरम्यान, ग्राहकांनी आपल्या आवडत्या गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह घेतली. तर काही उद्योजक ग्राहकांनी कमर्शियल गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह घेऊन आनंद व्यक्त केला.