शिरूर: “दैनिक प्रभात’च्या वतीने शिरूर येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या मैदानावर भव्य वाहन मेळावा (ऑटो झोन) आयोजित करण्यात आला आहे. या वाहन मेळाव्यास तिसऱ्या दिवशी नागरिक, ग्राहकांनी वाहन मेळाव्यास भेट दिली. या वाहन मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला. संपूर्ण मेळावा परिसर नागरिकांनी गजबजून गेला आहे. या मेळाव्यात बी यु भंडारी यांचा सुद्धा स्टॉल असून त्यांच्या एमजी फॅक्टर कार’ला ग्राहकांची पसंती मिळत आहे.