मुंबई – मुंबईकर सहकारी खेळाडू अजिंक्य रहाणे याला त्याचा मुंबईकर मित्र वासिम जाफरने एक संदेश
पाठवला आहे.
संघाचे नेतृत्व करण्यासाठी शुभेच्छा देतानाच संघात लोकेश राहुल, शुभमन गिल यांना दुसऱ्या कसोटीसाठी संघात स्थान देण्याचा सल्लाही दिला आहे. हा संदेश जेव्हा रहाणेला मिळाला तेव्हा खरेतर एक गुप्त संदेश मिळाल्याची चर्चा होती.
मात्र, या संदेशावर शंका घेण्यासारखे नसून केवळ मित्रत्वाने दिलेला सल्ला असल्याचे स्पष्ट झाल्याने यावर सुरू झालेले कवित्व संपुष्टात आले.