मेलबर्न – पृथ्वी शॉ याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. तसेच त्याचे संघातील स्थानही कायम राखले गेले पाहिजे, तरच त्याचा आत्मविश्वास वाढेल, असे मत मिस्टर क्रिकेट म्हणून ओळखल्या जात असलेल्या माईक हसीने व्यक्त केले आहे.
शॉ याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत फक्त चार धावा करता आल्या. त्याशिवाय दोन्ही डावांत तो सारख्याच पद्धतीने त्रिफळा बाद झाल्यामुळे चोहीकडून त्याच्यावर टीका होत आहे. मेलबर्नची खेळपट्टी मात्र, फलंदाजीला साजेशी आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्याला आणखी एक संधी द्यावी, असेही हसी म्हणाला.