इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला टी-२० सामना पर्थमध्ये खेळला गेला. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू वेड ( Matthew Wade ) सोशल मीडियावर चांगलाच टीकेचा धनी ठरला आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात मॅथ्यू वेडने फलंदाजी करत असताना विरोधी संघाच्या क्षेत्ररक्षणात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याच कारणामुळे सध्या मॅथ्यू वेडवर ( Matthew Wade ) जोरदार टीका केली जात आहे. त्याचबरोबर त्याच्या वर्तनामुळे नेटकऱ्यांकडून सध्या ऑस्ट्रेलियन संघावरही निशाणा साधला जात आहे.
मॅथ्यू वेडच्या ( Matthew Wade ) या कृत्यानंतर त्याच्यावर टीका होऊ लागली आहे. यानंतर संघातील बरेच खेळाडू त्याच्या समर्थानात उतरले आहेत. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसनेही त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘जेव्हा चेंडू तुमच्या डोक्यावर असतो, तेव्हा तुम्ही धाव घेताना पाहू शकत नाही आणि मग असे होते’ असे स्टॉइनिसने म्हटले आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला टी-२० सामना खेळला पर्थ येथील मैदानावर खेळला गेला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २०८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ लक्ष्याचा पाठलाग करत असताना मॅथ्यू वेड ( Matthew Wade ) फलंदाजी करत होता. १७व्या षटकात इंग्लडचा मार्क वुड गोलंदाजी करण्यासाठी आला. वुडने फेकलेल्या चेंडूवर मॅथ्यू वेडने त्याच्याविरुद्ध एक जोरदार फटका खेळला. मात्र, चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागून हवेत गेला, यानंतर मॅथ्यू वेड धाव घेण्यासाठी धावला. यादरम्यान झेल घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या मार्क वूडच्या समोर वेड आडवा आला आणि तो झेल मार्क वुड पकडू शकला नाही.
या सर्व प्रकारानंतर इंग्लड संघाने खेळात मॅथ्यू वेड ( Matthew Wade ) विरोधात कोणतेही अपील केले नाही. त्यामुळे खेळात कोणताही आडथळा न येता खेळ सुरु राहिला. या प्रकाराबाबत इंग्लड संघाचा कर्णधार जोस बटलरने प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही ऑस्ट्रेलिया संघाविरुध्द्व नुकताच दौरा सुरू केला आहे. त्यामुळेच आम्हाला कोणत्याही प्रकारचा वाद नको आहे’, असे बटलरने म्हटले आहे.