ICC ODI World Cup 2023 Australia vs Sri Lanka Live Score : आज विश्वचषक 2023 च्या 14 व्या सामन्यात पाच वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा सामना 1996 च्या चॅम्पियन श्रीलंकेशी होत आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेचा संघ 43.3 षटकात 209 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 210 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंकेचा डाव 43.3 षटकांत 209 धावांत गुंडाळला आहे. श्रीलंकेच्या संघाला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. कुसल परेरा आणि पथुम निसांका यांनी पहिल्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी करून श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. निसांका 67 चेंडूत 61 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार मारले. त्यांच्यानंतर परेरा 82 चेंडूत 78 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 12 चौकार मारले. हे दोघे बाद झाल्यानंतर लंकेचा संघ 209 धावांवर गडगडला. श्रीलंकेच्या 9 विकेट केवळ 84 धावांवर पडल्या.
Sri Lanka bowled out for 209.
It’s our time to defend with all our might!#LankanLions #SLvAUS #CWC23 pic.twitter.com/mO36oS96Xe— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 16, 2023
निसांका आणि मेंडिस व्यतिरिक्त फक्त चरित अस्लंकाला दुहेरी आकडा गाठता आला. त्याने 25 धावा केल्या. दासून शनाका बाद झाल्यानंतर कर्णधार असलेल्या कुसल मेंडिसला केवळ नऊ धावा करता आल्या. पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा सदीरा समरविक्रमा आठ धावांवर बाद झाला. धनंजय डी सिल्वा सात आणि लाहिरू कुमारा चार धावा करून बाद झाले. चमिका करुणारत्ने आणि दुनिथ वेललागे यांना प्रत्येकी दोनच धावा करता आल्या. महिशला तिक्षीना खाते उघडता आले नाही. तर, दिलशान मदुशंका खाते न उघडता नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाकडून लेगस्पिनर अॅडम झाम्पाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. झाम्पाने 8.0 षटकात 47 धावा दिल्या. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. स्टार्कने 10 षटकात 43 तर कमिन्स यानं 7.0 षटकात 32 धावा दिल्या. ग्लेन मॅक्सवेलने एक विकेट घेतली. त्यानं 9.3 षटकात 36 धावा दिल्या. जोश हेझलवूड यांन 7 षटकात 36 धावा दिल्या, त्याला एकही गडी बाद करता आला नाही.
दरम्यान, श्रीलंकेच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. नियमित कर्णधार दासुन शनाका दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाला प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी चमिका करुणारत्ने आणि लाहिरू कुमारा प्लेइंग-11 मध्ये परतले आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
AUS vs SL दोन्ही संघांचे Playing-11 –
ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), अॅडम झाम्पा, जोश हेझलवुड.
पाच वेळा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया 10 संघांच्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. त्याचा नेट रन रेट -1.846 आहे. -1.161 च्या नेट रन रेटसह श्रीलंका सातव्या क्रमांकावर आहे.
श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर/कर्णधार), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेलालागे, महिश तिक्षना, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका.