मुंबई :– आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ( International Olympic Committee )अखेर आयसीसीची विनंती मान्य करत 2028 साली अमेरिकेतील लॉस एंजीलस शहरात होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत टी-20 क्रिकेटचा अधिकृत समावेश करण्यात आल्याचे जाहीर केले. मुंबईत सोमवारी समितीच्या 141 व्या बैठकीत घेतलेल्या मतदानात क्रिकेटच्या बाजूने मोठा कौल पडला. या मतदानात क्रिकेटच्या विरोधात केवळ 2 मते पडली व 99 मते क्रिकेटच्या समावेशाच्या बाजूने पडली. या निर्णयामुळे आता तब्बल 128 वर्षांनंतर पुन्हा एकदाऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले जाणार आहे.
क्रिकेटसह बेसबॉल, सॉफ्टबॉल, स्क्वॉश, लॅक्रॉस व फ्लॅग फुटबॉल या अन्य खेळांचाही समावेश करण्यात आला आहे. देशातील स्थानिक खेळ म्हणून बेसबॉललाही स्थान मिळाले आहे. आयसीसीने क्रिकेट खेळणाऱ्या विविध देशांच्या मदतीने केलेल्या अथक प्रयत्नांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला आहे.
Who will win Gold at @LA28? 🤔#LA28Bound
✍: https://t.co/P4kxQMjgeG pic.twitter.com/qXzfmdQoHB
— ICC (@ICC) October 16, 2023
क्रिकेट हा खेळ अद्याप अमेरिकेत विकसित झालेला नाही. मात्र, भारतीय उपखंडातील अनेक लोक नोकरी व व्यावसायानिमित्ताने अमेरिकेत राहात आहेत. तसेच न्युयॉर्कमध्ये मेजर क्रिकेट लीगचला लाभलेल्या प्रेक्षकांची संख्या पाहून समितीनेही क्रिकेटच्या समावेशाबाबत अनुकुलता दर्शवली होती. मात्र, त्यासाठी मतदान घेतले जाणार होते.
टी-20 विश्वकरंडकामुळे वातावरण अनुकुल
अमेरिकेत क्रिकेट फारसे लोकप्रीय नाही. मात्र, आयसीसीने पुढील वर्षी वेस्ट इंडिजसह अमेरिकेतही टी-20 विश्वकरंडक आयोजित केला असल्याने समितीनेही त्याची दखल घेतली. आयपीएल स्पर्धेप्रमाणे फ्रॅंचायझी क्रिकेट अमेरिकेत सातत्याने होत आहे. त्याला मोठा प्रेक्षकवर्गही मिळत आहे. या खेळाची अमेरिकेत वाढत चाललेली लोकप्रियता पाहता समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी याचा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा यासाठी पुढाकारही घेतला होता.
Los Angeles Olympics 2028 : 128 वर्षांची प्रतिक्षा संपली; अखेर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश #LosAngelesOlympics2028 #T20Cricket pic.twitter.com/Mga4gDM71t
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 16, 2023
123 वर्षांची प्रतिक्षा संपली
क्रिकेटच्या ऑलिम्पिकमधील समावेशाने 123 वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली. 1900 साली ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा सर्वप्रपथम समावेश करण्यात आला होता. त्यावेळचे विजेतेपग इंग्लंडने फ्रान्सचा पराभव करुन पटकावले होते. त्यानंतर क्रिकेट हा खेळ ऑलिम्पिकमधून वगळण्यात आला होता.
फुटबॉलनंतरचा दुसरा सर्वात लोकप्रीय खेळ
जागतिक क्रीडा क्षेत्रात सर्वाधिक लोकप्रीय खेळात फुटबॉलचा क्रमांक पहिला आहे. त्यानंतर क्रिकेटचीच लोकप्रीय सर्वात जास्त आहे. भारतीय उपखंडातील व्यक्ती अमेरिकेसह ज्या अन्य देशात स्थलांतरीत झाले आहेत, त्यांच्यामुळेच त्या देशातही क्रिकेटची लोकप्रीयता वाढू लागली आहे.
प्रक्षेपण हक्कांतून समितीही होणार मालामाल
आयसीसी जेव्हा मोठी स्पर्धा आयोजित करते तसेच विश्वकरंडक स्पर्धाही आयोजित करते तेव्हा त्यांना या स्पर्धेच्या प्रक्षेपण हक्कांच्या विक्रीतून विक्रमी कमाई होते. त्याचे आकडे पाहीले तर सर्वसामान्य व्यक्तीही गांगरुन जातो. हीच आकडेवारी पाहून ऑलिम्पिक समितीनेही क्रिकेटला पाठींबा दिला. आता त्यांनाही या स्पर्धेच्या सामन्यांचे प्रक्षेपण हक्क विक्रीतून प्रचंड रक्कम मिळणार आहे.