छ. संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील हर्सूल कारागृहात काही कैद्यांनी एकत्र येऊन तुरूंगाधिऱ्यासह कारागृहातील कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित अधिकारी कारागृहात कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर कैद्यांनी हल्ला केला आहे. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात एकूण 9 कैद्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहरुख अकबर शेख (वय 30वर्षे), सतिश खंदारे (30), गजेंद्र ऊर्फ दादा तुळशीराम मोरे (42), निखील गरड (25), किरण साळवे (22), ऋषीकेश तनुपरे (25), अनिल शिवाजी गडवे (25), अनिकेत दाभाडे (22), राज जाधव (26) अशी आरोपींची नावे आहेत.
हर्सूल कारागृहातील पथक कैद्यांची झडती घेत असताना हा हल्ला करण्यात आला आहे. तुरुंगाधिकारी प्रवीण रामचंद्र मोडकर, अमित चंद्रकांत गुरव आणि सुमंत सुर्यभान मोराळे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.