दुर्दैवी ! पेट्रोल भरायला जाताना अपघात; ऊसाने भरलेले ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

कन्नड (जि. औरंगाबाद) – पेट्रोल भरायला जात असताना ऊसाने भरलेले ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कचरू वामनराव चव्हाण (वय 52) असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

हा अपघात कन्नड-औरंगाबाद रस्त्यावरील मकरनपूर पुलाजवळ गुरूवारी (ता.25) संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी चव्हाण हे दुचाकीवरुन पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जात होते. यावेळी ऊसाने भरलेला ट्रॅक्टर बारामती कारखान्याकडे जात असताना हा अपघात घडला. या अपघातात ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचे चाक चव्हाण यांच्या पोटावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले.

त्यांना ग्रामस्थांनी तात्काळ उपचारासाठी कन्नड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चव्हाण यांना मृत घोषीत केले. या घटनेने पोलिस दलासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.