भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या दोघांचा लग्नबंधनाला सात वर्ष पूर्ण झाले आहेत. या आनंदाच्या क्षणांना साजरा करण्यासाठी रोहित शर्माने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रोहित शर्माला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चेंडूचा झेल पकडताना हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे त्या सामन्यानंतर तो मालिकेतील उर्वरित एक एकदिवसीय सामना आणि आता कसोटी मालिकेतून देखील बाहेर पडला आहे.
“मला सिंगल घ्यायला सांगत राहा, नाहीतर मी…”, ईशान किशनचं विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य!
रोहित शर्माने ( Rohit Sharma ) त्याची पत्नी रितिकाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इंस्टाग्राम खात्यावरून काही खास फोटो शेअर केले आहेत. रोहित आणि रितिका त्यांच्या आयुष्यात अत्यंत आनंदी असल्याचे या फोटोंमध्ये दिसत आहे. रोहितने हे फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातच चाहत्यांनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला. अनेकांनी तर ही जगातील सर्वात खास जोडी असल्याचे देखील म्हटले आहे. तर काहींनी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) दुखापतीतून लवकर बरा व्हावा अशा इच्छा व्यक्त व्यक्त केलीय.
“मला सिंगल घ्यायला सांगत राहा, नाहीतर मी…”, ईशान किशनचं विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य!
View this post on Instagram
विशेष म्हणजे, रोहित शर्माने ( Rohit Sharma ) पाच वर्षांपूर्वी याच दिवशी आपल्या वनडे कारकिर्दीतील तिसरे द्विशतक झळकावले होते. १३ डिसेंबर २०१७ रोजी रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात २०८ धावांची नाबाद शानदार खेळी खेळून आपल्या पत्नीला लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या खेळीत त्याने १३ चौकार आणि १२ षटकार मारले होते. त्याच्या त्या खेळीमुळे टीम इंडियाने तो सामना १४१ धावांनी जिंकला होता.