नवी दिल्ली – सध्या चिनी वस्तूविरोधात वातावरण आहे. त्यामुळे चिनी मोबाइल वितरकांना आंदोलकांचा त्रास होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीकडे इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन या संघटनेचे लक्ष आहे.
गैरप्रकार आढळून आल्यास वितरकांनी किंवा कंपन्यांनी संघटनेकडे कळवावे. म्हणजे यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. दुकान किंवा कंपनीविरोधात कंपनीच्या बाहेर आंदोलन झाल्यास किंवा मालमत्तेची हानी झाल्यास त्यानंतर व्यापार श्रृंखलेवर परिणाम होतो. जर मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असेल किंवा झाले असेल तर संबंधित पोलीस ठाण्याला कळवून आम्हाला त्याची माहिती द्यावी, असे असोसिएशनने म्हटले आहे.