जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ९३८ वर पोहचली…
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ४७ जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला. रात्री उशिरा १९ जणांचा अहवाल आला. त्यापूर्वी सकाळी २८ जण पाँझिटिव्ह आलेहोते. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९३८ झाली आहे.
विविध रुग्णालयांत व करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील १९ जणांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या करोनाबाधित १९ रुग्णांमध्ये १३ पुरुष व ६ महिलांचा समावेश असून यात मुंबई येथून प्रवास करुन आलेले १२ प्रवासी, ७ निकटसहवासातील आहेत.
बाधित रुग्णांमध्ये कराड तालुक्यातील जखीणवाडी येथील ४७ वर्षीय महिला, २३ वर्षीय युवती, ५२ वर्षीय पुरुष व १९ वर्षीय युवक, लटकेवाडी येथील ५० वर्षीय पुरुष व १९ वर्षीय युवक आणि ४२ वर्षीय महिला व २१ वर्षीय युवती, मलकापूर येथील २९ वर्षीय पुरुष, चचेगाव येथील ३४ वर्षीय पुरुष, खंडोबानगर (मलकापूर) येथील ८ वर्षीय बालक, वय ३० व ५० वर्षीय पुरुष आणि वय ४५ व ३० वर्षीय महिला., पाटण तालुक्यातील नवसरे येथील ४२ वर्षीय पुरुष, गमेवाडी येथील ५० वर्षीय पुरुष.,खटाव तालुक्यातील खटाव येथील येथील ६२ वर्षीय पुरुष., माण तालुक्यातील म्हसवड येथील ५८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.