पुणे – प्रेमसंबंधाला कुटुंबियांकडून विरोध होण्याच्या भीतीने प्रेमीयुगुलाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला असून तरुण बचावला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तरुणीच्या वडिलांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
माधवी (नाव बदलले) एका कंपनीत कामाला होती. त्याठिकाणी तिचे माधव (नाव बदलले) या तरुणासोबत प्रेम संबंध निर्माण झाले. काही महिन्यांनी माधव नोकरी सोडून दुसरीकडे कामाला गेला होता. तरीही दोघांचे प्रेम कायम होते.
परंतु, घरच्यांकडून प्रेमाला विरोध होईल, ही भीती माधवच्या मनात होती. त्यामुळे 4 डिसेंबरला दोघांनी भेटून विषप्राशन केले. त्यानंतर त्रास होऊ लागल्यामुळे माधवने नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही ससून रुग्णालयात दाखल केले.
शरीरात जास्त प्रमाणात विष पसरल्याने माधवी 14 डिसेंबरच्या रात्री तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर, तीन दिवसांच्या उपचारानंतर माधवची तब्येत सुधारली.