पुणे – वाघोलीत प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन तरुणाचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पाटस टोलनाका परिसरात सापळा लावून पकडले. सागर अशोक गायकवाड ( ३१, रा. वाघजाईनगर, दौंड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. महेश साधू डोके ( २१, रा. माउली बालक आश्रम, वाडेबोल्हाई) असे खून झालेल्याचे नाव आहे. आरोपी सागर आणि महेश मित्र होते.
प्रेमप्रकरणातून त्यांच्यात वाद झाला होता. या कारणावरुन चिडलेल्या सागरने महेशवर कोयत्याने वार केले. त्याचा खून करुन ताे पसार झाला होता. तो चेन्नई एक्स्प्रेसमधून पुण्याकडे निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दौंड तालुक्यातील रेल्वे फाटक परिसरात चेन्नई एक्स्प्रेस क्राॅसिंगसाठी थांबली होती. त्यावेळी रेल्वेगाडीतून गायकवाड उतरला. तेथून तो पाटस टोलनाक्याकडे निघाल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, सहायक निरीक्षक रवींद्र गोडसे, जाधव आणि फरांदे यांनी त्याला सापळा लावत पकडले.