गाईच्या तुपात भेसळ करून विक्री करणाऱ्याला अटक

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

पुणे(प्रतिनिधी) – गाईच्या तुपात भेसळ करून विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून 4 लाख 50 हजार रुपयांचे 1 हजार 499 किलो भेसळयुक्त तुप जप्त करण्यात आले आहे.

शिवराज हळमणी (रा. हात्तीकनबस, अक्कलकोट ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक आंबेगाव परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एका टेम्पोतून गाईचे भेसळयुक्त तूप विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती कर्मचारी राहूल तांबे आणि सचिन पवार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एका महाविद्यालयासमोर आलेल्या टेम्पोचालकाला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याच्याकडीत टेम्पोतील गाईच्या तुपात भेसळ असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार भेसळयुक्त तुपाची खात्री झाल्यानंतर तुप जप्त करण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, हवालदार संतोष भापकर, सोमनाथ सुतार, रवींद्र भोसले, पोलीस नाईक सर्फराज देशमुख, सचिन पवार, कॉन्स्टेबल अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.