नवी दिल्ली – सध्या राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस 3570 किलोमीटर लांबीची भारत जोडो यात्रा काढत आहे. सध्या यात्रेत 9 दिवसांचा ब्रेक आहे. तर, 3 जानेवारीला ती पुन्हा कश्मिरी गेटपासून सुरू होईल आणि प्रवास पूर्ण करेल. यात्रेदरम्यान राहुल गांधी केवळ टी-शर्ट घातलेले दिसतात. दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी असूनही राहुल गांधींच्या टी-शर्टवरील छायाचित्रे केवळ प्रसिद्धीच्याच झोतात नाहीत, तर सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. सगळ्यांच्या जिभेवर एकच प्रश्न आहे की? ‘या थंडीत राहुल गांधी फक्त टी-शर्ट घातलेले कसे दिसत आहेत. राहुल गांधींना थंडी वाजत नाही का?’ असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात असून, त्यांना ट्रोल देखील करण्यात येत आहे.
मात्र, आता राहुल गांधींना ट्रोल करण्यासाठी उर्फी जावेदच्या नावाचा वापर भाजपाकडून करण्यात आला आहे. टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आणि प्रसंगी वादातही असते. अश्यातच, भाजप नेते दिनेश देसाई यांनी ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींवर उपहासात्मक टीका केली आहे.
अगर ठंड में सिर्फ एक टीशर्ट पहने की वजह से राहुल गांधी भारत का प्रधानमंत्री बनने के लायक हो सकता है तो फिर ऊर्फी जावेद तो अमेरिका का राष्ट्रपति होना चाहिए 🤣🤣
— Dinesh Desai (@idineshdesai) December 28, 2022
“जर थंडीमध्ये फक्त एक टी-शर्ट घातल्यामुळे राहुल गांधी भारताचे पंतप्रधान होण्यासाठी पात्र होणार असतील, तर मग उर्फी जावेद तर अमेरिकेची राष्ट्रपतीच असायला हवी’. असं देसाई यांनी म्हटल आहे. दरम्यान, आता दिनेश देसाई यांच्या या ट्विटला स्वतः अभिनेत्री उर्फी जावेद हिने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सध्या या दोघांमध्ये ट्विटरवॉर रंगला असल्याचं दिसून येत आहे.
Don’t know about Rahul Gandhi but I’ll be a better politician than you . Mere raj me ek bhi aurat ko uske kapdo ko lekar insult Nahi kiya jayega . Is this the kinda politics you wanna play ? Insult a women to make your point?
— Uorfi (@uorfi_) December 28, 2022
उर्फी चांगलीच भडकली असून, या ट्वीटवर तिनं आक्रमक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं. तसेच, आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनही स्क्रीनशॉट शेअर करत संताप व्यक्त केला. “हे तुमचे राजकारणी आहेत का? काहीतरी चांगलं करा! अशा लोकांकडून महिलांना सुरक्षा पुरवण्याची अपेक्षा कसी करू शकतो आपण?’ असं उर्फी म्हणाली आहे.
दरम्यान, आता उर्फीच्या या ट्विटला दिनेश देसाई यांनी आणखी एक ट्विट करत उत्तर दिल आहे. “भारताची संस्कृती किंवा महिलांचा सन्मान याच्याशी संबंधित महिलेचा काहीही संबंध नाही. आमच्यासाठी झाशीची राणी लक्ष्मीबाई प्रेरणास्रोत आहेत. तुमचे सोशल मीडिया फोटो आणि व्हिडीओ नाही’. या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे. मात्र, आता दिनेश देसाई यांच्या या ट्विटला अभिनेत्री उर्फी जावेद कश्या प्रकारे प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.